राज्यातील १२ जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालये नाहीत. त्यामुळे वैद्यकिय शिक्षण विभागासंदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही महाविद्यालये उभारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंटकडून चार हजार कोटींचं कर्ज दिलं जात आहे. या कामांना लवकरच सुरुवात होईल. केंद्र सरकारकडूनही निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, असं आश्वासन राज्याचे नवनिर्वाचीत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिलं आहे.
#GirishMahajan #DevendraFadnavis #EknathShinde #Shivsena #BJP #Maharashtra #Medical #Institute #University #HWNews